Home महाराष्ट्र शिवसेनेच्या दाव्यावर भाजपचा पलटवार; म्हणाले, शिवसेनेला फुसके बार सोडायची जुनी सवय

शिवसेनेच्या दाव्यावर भाजपचा पलटवार; म्हणाले, शिवसेनेला फुसके बार सोडायची जुनी सवय

0
शिवसेनेच्या दाव्यावर भाजपचा पलटवार; म्हणाले, शिवसेनेला फुसके बार सोडायची जुनी सवय

मुंबई – भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेनेचा केलेला दावा केवळ फुसका बार आहे, असं भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. भाजपचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.

मागील 25 वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिले. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोला भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here