Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र Gulabrao Patil: पाणी टंचाईवरुन भाजपाने दाखविले गुलाबराव पाटलांना काळे झेंडे

Gulabrao Patil: पाणी टंचाईवरुन भाजपाने दाखविले गुलाबराव पाटलांना काळे झेंडे

0
Gulabrao Patil: पाणी टंचाईवरुन भाजपाने दाखविले गुलाबराव पाटलांना काळे झेंडे

 जळगाव (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

जिल्ह्यातील धरणगाव शहरात दोन आठवड्यांपासून पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

धरणगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानाच्या सुशोभिकरणाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी भाजपचे नगरसेवक तसेच कार्यकर्ते हे हातात काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत कार्यक्रमस्थळी धडकले. ‘पालकमंत्री गो बॅक’च्या घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले. भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ऐकून शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनीही पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन म्हणाले की, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री गुलाबराव पाटील करतात. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता खाते आहे. पण तरीही धरणगाव शहरात २० दिवस पाणीपुरवठा होत नाही. राज्यभर पालकमंत्री पाणी योजनांची माहिती देत फिरतात. पण धरणगावकरांना ते सुरळीत पाणी देऊ शकत नाही. पाण्याच्या मुद्द्यावर ते राजकारण करतात. पालकमंत्री म्हणून ते निष्क्रिय असून आम्ही अशा राजकारणाचा निषेध करत असल्याचे संजय महाजन म्हणाले.



या प्रकारानंतर भूमिपूजन सोहळ्यात मनोगत करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, काळे झेंडे दाखवायला भाजप कार्यकर्त्यांमध्ये ताकद नाही. तो आमचा धंदा आहे. त्यांनी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला पण ही प्रॅक्टिस पण पूर्ण होऊ शकली नाही. पाणीपुरवठा हा विषय असेल तर आधी तुमच्या खासदार आणि पूर्वी मंत्री असलेल्यांना प्रश्न विचारा. तुमचा बापजादा पण आला तरी इथे भगवाच फडकणार आहे. धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळामुळे काही तांत्रिक बाबी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे, असेही ते म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here