पुणे, 7 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ इर्टिका या चारचाकी मोटार वाहनाचा पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. या गाडीने डिव्हायडर तोडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिला. या अपघातात बोलेरो गाडीमधील तिघे जणं व इर्टिकामधील एक जण जागीच ठार झाले.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर इंदापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर व्यवहारे पेट्रोल पंपानजीक बोलेरो आणि इर्टिकाला भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. साधारण दुपारी हा भीषण अपघात झाला आहे.