Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र Dhangar Reservation | …अखेर चौंडीतील धनगर आंदोलनकर्त्यांचं उपोषण मागे; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यतीने सोडला उपोषण

Dhangar Reservation | …अखेर चौंडीतील धनगर आंदोलनकर्त्यांचं उपोषण मागे; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यतीने सोडला उपोषण

0
Dhangar Reservation | …अखेर चौंडीतील धनगर आंदोलनकर्त्यांचं उपोषण मागे; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यतीने सोडला उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू झाले. त्याचवेळी नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान चौंडी येथे 21 दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू होते. मात्र, सरकारसोबत बैठक होऊनही आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवले.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने सरकारवरही दबाव वाढत होता. या धनगर समाजाच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सरकारच्या चौंडीत दाखल झाले होते. अखेर त्यांच्या वागणुकीला मोठे यश मिळाले असून 21 व्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे.

मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) चौंडीतील आंदोलनाला वारंवार भेटी दिल्या आहेत. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपोषणकर्त्यांची भेटही घेतल्या आहेत. मात्र, मार्ग निघत नसल्याने हे आंदोलन सुरूच होते.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती. धनगर एस.टी. आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे महाजनांनी सांगितले. ‘समाजाने उपोषण आंदोलन मागे घेत सरकारला वेळ द्यावा. ठरलेल्या वेळेत सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेईल,’ असा निरोप मंत्री महाजन हे सरकारच्या वतीने घेऊन आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here