शासननामा न्यूज ऑनलाईन
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीच, मात्र ओबीसी समाजाला खूप कमी आरक्षण आहे. त्यामुळे त्यांना वेगळं आरक्षण द्या असं माझं म्हणणं आहे. हे मत माझं एकट्याचंच नाही तर इतर अनेक नेत्यांचं देखील हेच मत आहे. त्यांना नाव घेऊन जरांगे का बोलत नाहीत? मला एकट्यालाच टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांना बोलावं, नाहीतर त्याला राजकीय वास येईल असं भूजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कांद्यांचा लिलाव बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत, यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरुवातीपासूनच कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आव्हान करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हे पहावं. आम्ही आमच्या स्थरावर प्रयत्न करत आहोत. व्यापाऱ्यांनी आता जास्त हट्ट करणं योग्य नाही. सरकारच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर पोलीस कारवाई करतील असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला आहे.