Home देश-विदेश महाराष्ट्रात परत सत्तांतर होणार ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच : उदयनराजे भोसले

महाराष्ट्रात परत सत्तांतर होणार ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच : उदयनराजे भोसले

0
महाराष्ट्रात परत सत्तांतर होणार ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच : उदयनराजे भोसले

सातारा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आजच्या पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीबाबत वक्तव्य केलं आहे.पंतप्रधान मोदींना भेटायला जाण्याआधी राज्य सरकारने चर्चा करून अधिवेशन बोलावणे गरजेचे होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान मोदींची भेट राजकीय तडजोडी साठीच घेतली असून या भेटीतून घेवाण-देवाण होणार आणि नंतर सत्तांतर होणार असल्याचे मोठे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे .

नक्की वाचा : ‘मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची गरज नव्हती

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणं, चर्चा करणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते का केलं नाही? असा सवाल उदनयराजे यांनी विचारलाय. ही भेट म्हणून देवाणघेवाणीतून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचेही ते म्हणाले . ते आज सातारा इथं पत्रकारांशी बोलत होते.उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यात मात्र नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

‘आरक्षणाबाबत आपण श्वेतपत्रिकेची मागणी केली होती. अद्यापही त्याबाबत त्यांनी काहीही केलेलं नाही. मोदीजींना भेटण्यासाठी जाण्याआधी तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्यात चर्चा करा आणि मग भेटायला जा. कधीही जा…’

‘आता हे जाऊन भेटणार आणि काय बोलणार.. राजकीय तडजोड, म्हणजे काय ठीक आहे आम्ही हे-हे करतो आणि आपण असं-असं एकत्र येऊयात. म्हणजे परत सत्तांतर होणार. म्हणजे काय देवाण-घेवाणच होणार ना.. असंच काही तरी होणार ना?’

नक्की वाचा: पुणे आग दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत

‘आता एवढं सगळं सुरु आहे संपूर्ण महाराष्ट्रात. कोण या मजल्यावरुन पडतंय तर कोणाच्या गाडीत काय सापडतंय.. आपल्याला माहित असतं ना काही तरी होईल. ठीक हे आम्ही हे असं करतो आपण एकत्र येऊयात आपलं लग्न पुन्हा लावूयात आणि समाजाला शांत करुयात.’

नक्की वाचा: पुण्यातील पाण्यातही सापडला कोरोनाव्हायरस; संसर्गाचा धोका किती?

‘खरं म्हणजे या आरक्षणामुळे लोकांच्या मनात आग पेटली आहे. काय बोलणार याला. या लोकांनी समाजाची मानसिक अवस्था अशी करुन ठेवली आहे की. नेमकं दार आहे की खिडकी असं झालं आहे. कोणी आत येतंय तर कोणी बाहेर पडतंय. एक डाव भुताचा असं चाललंय.’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.

याचा अर्थ स्पष्टच आहे आणि उदयनराजे भोसले यांच्या रोख त्याच दिशेने आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट ही फक्त राजकीय तडजोडीसाठीच घेतली आहे.

नक्की वाचा: रजेच्या पैशांसाठी मागितली लाच; मनपाचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here