सातारा – खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे हेलीकाॅप्टर परत पुणयाकडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त, दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देणार होते असा त्यांचा दाैरा निश्चित हाेताे. मात्र आता त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या काेयनानगर परिरात पडत असलेला पाऊस, वारा व ढगाळ वातावरणाने त्यांचे हेलिकॅप्टर पुन्हा पुण्याला रवाना करण्यात आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे हे कोयनानगरच्या दौऱ्यावर येण्यासाठी पुण्यातून निघाले होते. ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांचा आजचा कोयनानगर दौरा रद्द करण्यात आला आहे.