Home महाराष्ट्र काँग्रेस आज कमजोर झाली असली तरी…: संजय राऊत

काँग्रेस आज कमजोर झाली असली तरी…: संजय राऊत

0
काँग्रेस आज कमजोर झाली असली तरी…: संजय राऊत

मुंबई: ‘काँग्रेस आज कमजोर झाली असली तरी तो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम अशा राज्यांमध्ये अजूनही त्यांचं चांगलं बळ आहे. काँग्रेसशिवाय देशातील विरोधी पक्षांची आघाडी पूर्ण होऊ शकत नाही,’ असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. (Sanjay Raut on Congress)

पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी जळगावात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट ही काही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असं मला वाटत नाही. या भेटीचा संदर्भ देशाच्या राजकारणाशी जोडू नये, असं ते म्हणाले. त्याचवेळी, त्यांनी देश पातळीवर विरोधी पक्षांची आघाडी उभी राहण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

‘काँग्रेसप्रणित यूपीएमध्ये किती पक्ष उरले आहेत, ते एकदा पाहावं लागणार आहे. या देशातील जे प्रादेशिक आणि विरोधी पक्ष आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक मजबूत आघाडी उभी करणं गरजेचं आहे. पण विरोधी पक्षांची आघाडी ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस कमजोर झाली असली तरी तो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम अशा राज्यांमध्ये अजूनही त्यांचे चांगले बळ आहे. या संदर्भात देशातील प्रमुख नेते चाचपणी करत असतील तर नक्कीच त्यातून भविष्यात दृश्य फळ बघायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचे प्रामाणिक प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या आंदोलनाला एक दिशा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here