कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गदर चिंताजनक आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण अधिक आहेत. निर्बंधांकडे दुर्लक्ष आणि वाढीव चाचण्या हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. More corona patients in rural areas Of Satara, Sangli, Kolhapur district
कोल्हापूर जिल्ह्यात दररोज सरासरी दीड हजारावर रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर मेमध्ये १५ टक्क्यांवर होता. परंतु तो ११ टक्क्यांच्या घरात आहे.
सांगली जिल्ह्यात मे महिन्यात रुग्णवाढीचा आलेख ३१ टक्क्यावर होता. गेल्या दहा दिवसांमध्ये तो १० टक्के आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यात ३६ टक्क्यांवर गेलेला संसर्ग दर सध्या ९.७५ टक्क्यांवर आला आहे. या जिल्ह्यातही संसर्गाचा हा दर ग्रामीण भागात मोठा आहे.