Home देश-विदेश देशातील कोरोनाबाधितांनी गाठला 70 दिवसांतील सर्वात कमी आकडा

देशातील कोरोनाबाधितांनी गाठला 70 दिवसांतील सर्वात कमी आकडा

0
देशातील कोरोनाबाधितांनी गाठला 70 दिवसांतील सर्वात कमी आकडा

Corona Update: कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 70 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 84,332 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 4002 रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या 24 तासांत 1 लाख 21 हजार 311 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जे पाहता तब्बल 40981 सक्रिय रुग्ण कमी झाल्याची बाब समोर आली. यापूर्वी 1 एप्रिलला देशात  81,466  कोरोनबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात कोरोना रुग्णसंख्येत होणारी कपात दिलासादायक असली तरीही, प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आज देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. 11 जूनपपर्यंत देशात 24 कोटी 96 लाख कोरोना लसी देण्यात आल्या. तर कोरोना चाचण्यांनी देशात 37 कोटी 62 लाखांचा आकडा गाठला आहे.

एकूण आकडेवारी किती? 
एकूण कोरोनाबाधित – दोन कोटी 93 लाख 59 हजार 155
एकूण कोरोनामुक्त – दोन कोटी दो करोड़ 93 लाख 59 हजार 155
एकूण मृत्यू – 3 लाख 67 हजार 81
एकूण सक्रिय रुग्ण – 10 लाख 80 हजार 690

देशातील कोरोना मृत्यूदर 1.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर  पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here