Coronavirus in Mumbai Latest Update: Coronavirus In Mumbai मोठा दिलासा: मुंबईत आज गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी रुग्णसंख्या – mumbai reports 529 fresh covid19 cases 725 recoveries and 19 deaths today active cases at 15550

0
55


हायलाइट्स:

  • मुंबईत गेल्या २४ तासांत ५२९ नवीन रुग्णांची नोंद.
  • १६ फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी करोना रुग्णसंख्या.
  • आज ७२५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.

मुंबई: मुंबईवरील करोना संसर्गाचा विळखा दिवसागणिक सैल होताना दिसत असून आज १६ फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५२९ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ७२५ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत करोनाने १९ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता १५ हजार २०२ इतका झाला आहे. ( Coronavirus In Mumbai Latest Update )

वाचा:मोठी बातमी: नागपूरची करोनामुक्तीकडे वाटचाल; ‘ही’ आहे ताजी स्थिती

मुंबईतील करोना रुग्णसंख्या आता वेगाने खाली येताना दिसत आहे. आज मुंबईत ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. हा १६ फेब्रुवारीनंतरचा निचांक ठरला. १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत ४६१ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली होती. मुंबईत आज ७२५ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख ८४ हजार १०७ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके आहे. मुंबईत ७ ते १३ जून या कालावधीत कोविड रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका राहिला असून रुग्णदुपटीचा कालावधी ६७२ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

वाचा: करोना: आजच्या रुग्णसंख्येत मोठी घट; ८,१२९ नवे रुग्ण, मृत्यू २००

राज्यात सर्वाधिक करोनामृत्यू मुंबईत झाले आहेत. आज १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा आता १५ हजार २०२ इतका झाला आहे. आज मृत पावलेल्या १९ रुग्णांपैकी १६ रुग्ण हे सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये ११ पुरुषांचा तर ८ महिलांचा समावेश आहे. ४० ते ६० वयोगटातील ६ जण तर ६० वर्षांवरील १३ जण आज दगावले. मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्यानंतर कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले तसेच पाच पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या इमारतीही सील करण्यात आल्या. करोनाची लाट ओसरत असताना त्याचे प्रमाणही आता कमी होत आहे. झोपडपट्टी विभाग आणि चाळींत आता २१ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ७७ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

धारावी पुन्हा प्रकाशझोतात

धारावीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या २४ तासांत धारावीत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. २ फेब्रुवारीनंतर धारावीत असं प्रथमच घडलं. मुख्य म्हणजे धारावीत आतापर्यंत करोनाचे ६ हजार ८६१ रुग्ण आढळले असून अॅक्टिव्ह रुग्णांची सख्या आता १३ पर्यंत खाली आली आहे. धारावीलगतच्या माहीममध्ये आज ६ तर दादर भागात ३ रुग्ण आढळले.

वाचा: धक्कादायक: शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या मुलीला म्युकरमायकोसिस



Source link