मुंबईचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७३३ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३८ हजार ६५२ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ७५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतील करोनाची आजची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ६६१
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ४८९
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६५९४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८४९८
रुग्ण दुप्पटीचा दर- ७३३ दिवस
कोविड वाढीचा दर ( २४ जून ते ३० जून)- ०.०९ %
ठाण्यात आज आढळले ९० नवे रुग्ण
दरम्यान, ठाण्यात आज ९० नव्या करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ठाण्यात एकूण २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच ठाण्यात आजपर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ४१५ इतक्या लोकांना करोनाची लागण झाली, तर त्यांपैकी १ लाख ३० हजार ४१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ठाण्यात ९९१ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ठाण्यात एकूण २ हजार ०१२ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.७५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर ठाण्यात रुग्ण दुपटीचा वेग हा १ हजार १५६ दिवसांवर आला आहे.