Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र करोना: राज्यात आज १२,५५७ नव्या रुग्णांचे निदान, २३३ मृत्यू

करोना: राज्यात आज १२,५५७ नव्या रुग्णांचे निदान, २३३ मृत्यू

0
करोना: राज्यात आज १२,५५७ नव्या रुग्णांचे निदान, २३३ मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

राज्यात दैनंदिन नव्या करोना (Coronavirus) बाधित रुग्णांचा आकडा आणखी खाली घसरला असून दिवसभरात १२ हजार ५५७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १४ हजार ४३३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही घसरला असून दिवसभरात २३३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या २३३ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ४३ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ०४१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ७३४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९ हजार २४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ८९१ इतकी आहे.



या बरोबरच अहमदनगरमध्ये ७ हजार २७८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार ५९५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ७९९ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ६१४, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ९३२ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार ८४८, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५३० इतकी आहे.



१३,४६,३८९ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६५ लाख ०८ हजार ९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ३१ हजार ७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ४६ हजार ३८९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ६ हजार ४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here