याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १ हजार १९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८५८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
मुंबईत आज ३७ हजार ८०२ चाचण्या
मुंबईत आज एकूण ३७ हजार ८०२ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ११ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ५४०
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६२८
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०११९५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७७१४
रुग्ण दुपटीचा कालावधी- ८५८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ०१ जून ते ०७ जुलै)- ०.०८ %