शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक प्रशिक्षण टप्प्यात बदल होणार आहेत..त्यानुसार आता शिक्षक होण्यासाठी करावा लागणार डीएडचा अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय..शिक्षक होण्यासाठी आधी बीएड आणि नंतर डीएडचा कोर्स करावा लागत होता..(D.Ed Course) मात्र आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यावर 4 वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे..या कोर्समध्ये अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा त्यासोबतच नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय.. मात्र हे नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार ? या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर केले गेले नाही.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची राज्यात लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असणार आहे.
नव्या धोरणात बीएडबाबत नेमकी तरतूद काय?
नव्या शैक्षणिक धोरणात डीएडचा अभ्यासक्रम नसणार
पोस्ट ग्रॅच्युएट विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएड करता येणार आहे
पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्म करता येणार आहे
बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत
यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे
दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत काही माहिती नाही. (D.Ed Course) मात्र सर्वच पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या महत्त्वाचा सर्वंकष विकास त्यातून घडणार आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे क्रेडिट पॉइंट्स विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.