मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. तुमच्याकडे बहुमत आहे, मग घाबरता का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. (Devendra Fadnavis’s election as Speaker of the Legislative Assembly has swayed the Mahavikas Aghadi government)
“विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत. ही बैठक विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण विधानसभा अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरता का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. हात वर करुन का? तुम्ही घ्या मतदान, पाहूया ताकद असे म्हणत फडणवीसांनी सरकारला चॅलेंज केला आहे.
पुढे ते म्हणतात, महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडले आहे. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर.
विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकार आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
नियम समितीमध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ पारित झाला आहे. प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु असून या समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी 2 सदस्य आहेत.