मुंबई (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथ बैठक घेतली या बैठकीची माहिती देताना धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत त्या लागू करण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले पण अॅट्रॉसिटी कायद्याची कवच पण धनगर समाजाला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण याच योजना जाहीर केल्या होत्या आता पुनः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच योजना जाहीर केल्या पण प्रत्यक्षात किती अमलबजाणीसाठी किती प्रयत्न होणार याचाही विचार व्हावा असा सूर धनगर समाजातून येत आहे की घोषणा कागदोपत्रीच राहणार?