…शिवसेनेवर धनगर समाज नाराज??

खासदार डॉ विकास महात्मे यांच्या संकल्पेतून भाजप सरकारच्या काळात मालेगांव येथे 4 अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात आले. सांस्कृतिक भावनांचा पाहणी दौरादरम्यान धनगर समाज व शिवसेनेत घोषणा युध्द झाले...

0
145


नाशिक (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

अलीकडेच अजंगवाडे मालेगाव नाशिकमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या त्यामधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाच्या महाराष्ट्रभर संकल्पना मांडणारे व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून कार्यक्षमतेने मंजूर करून घेणारे खा. डॉ.विकास महात्मे यांचे साधे नावही निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आले नव्हते याचा धनगर समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Dhangar Samaj angry with Shiv Sena ??) सबंध महाराष्ट्रभर १२८ गावांची नावे प्रस्तावित करण्यात आली होती पैकी ५८ गावे ग्रामीण भागातील असून उर्वरित गावे शहरी भागातील आहेत त्यासाठी रू. ६२,५३,४००/- प्रती सभागृह असा निधी मंजूर करण्यात आला होता.

…शिवसेनेवर धनगर समाज नाराज??
भाजप सरकारच्या काळातील शासन निर्णय

मालेगांव येथील संक्राळे, दहिदी,अजंगवाडे, तळवाडे या गावांमध्ये पदंश्री डॉ विकास महात्मे यांच्या संकल्पेतून भाजप सरकारच्या काळात 4 अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात आले. सांस्कृतिक भावनांचा पाहणी दौरा खासदार पदंश्री डॉ महात्मे यांनी आयोजित केला त्यानुसार त्यांनी प्रथम तळवाडे येथील सांस्कृतिक भावणास भेट दिली असतांना तेथील ग्रामस्थांनी प्रचंड उत्साहात स्वागत केली व भवनाची पाहणी करून पुढे आजंगवाडे येथील सांस्कृतिक भावणास भेट देत असतांना ठेकेदारा मार्फत सांस्कृतिक भावणास मुद्दाम कुलुप लावून ठेवले आणि बाहेरून काही शिवसैनिक येऊन घोषणाबाजी करू लागले असताना तेथील धनगर समाज विरुद्ध शिवसेनेचा घोषणा युद्ध झाले. (Shiv Sena declares war against Dhangar Samaj)

मालेगावचे आमदार व राज्याचे मंत्री यांनी त्या जुन्याच योजनेचे श्रेय मिळविण्यासाठी उद्घाटनाचा घाट घातला व पुन्हा तो रद्द करावा लागला. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जगाने अठराव्या शतकातील अद्वितीय महिला राज्यकर्ती असा सन्मान दिला त्यांच्या नावाच्या सांस्कृतिक भवनाच्या कार्यात उद्घाटनाचे हे राजकारण तत्वाला धरून दिसत नाही. जर मंत्रीमहोदय यांना फारच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांबद्दल आदर असेल तर त्यांच्या नावे नवीन योजना तयार करून कार्यवाही करावी.

एक तर धनगर समाजाला एस टी (Dhangar ST Reservation) आरक्षण अंमलबजावणी होई पर्यंत विकासासाठी मागील सरकारने जाहीर केलेले १००० कोटी अजुन मिळालेले नाहीत जे काम झालय त्याचाही श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्तेतील पक्षाचा दिसत आहे.

महाराष्ट्रातील १८% लोकसंख्या असलेल्या समाजाला कायदेमंडळात प्रतिनिधित्व नाही! पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठीची कार्यवाही दिसत नाही, तरीही शिवसेना धनगर समाजाला गृहीत धरून आपले सरकार चालवीत आहे पण निवडणुकांमध्ये एवढी मोठी मतपेढी दुर्लक्ष केल्याने अवसान घात होईल याचा विचार शिवसेना पक्षनेतृत्वाने करण्याची गरज आहे अशी मागणी धनगर समाजातून होत आहे.

यावेळी खासदार महात्मे यांच्या सोबत धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, भाजप मालेगांव तालुका अध्यक्ष निलेश कचवे सर, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, ज्ञानेश्वर परदेशी, लक्ष्मण जाधव, विजय मोरे, बादल मोरे, अनिल पवार, सुभाष पांसारे, बंडू कुंवर, बंडू तात्या व धनगर समाज बांधव उपस्थित होते.

खासदार डॉ विकास महात्मे हे संयमी नेते आहेत ते इतर नेत्यांप्रमाने आक्रस्ताळी भूमिका घेत नाहीत याचा गैरफायदा स्थानिक नेते घेताना दिसतात. अशी समज स्थानिक नेत्यांची असेल तर त्यांनी भ्रम दूर करावा अन्यता धनगर समाजच नव्हे तर ओबीसी, भटके विमुक्त समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी मांडली.