चिखली (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
चिखली येथील शासकीय विश्रामगृहात चिखली तालुक्यातील धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. “माझा समाज-माझा अभिमान-मी धनगर” महाराष्ट्राचा हे ब्रीद घेवुन चिखली सह तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी आपल्या सामाजिक मागण्यांसाठी आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्याकडे निवेदन दिले.
संपुर्ण हिंदुस्थानात आपल्या आदर्श राज्यकारभाराने आणि जनतेचे हित जोपासुन जनमाणसात आदराचे स्थान मिळवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक चिखली शहरामध्ये व्हावे तसेच तालुक्यातील धनगर समाज बांधवांसाठी भव्य तालुकास्तरीय सभागृह असावे यांसह धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणी,मेंढपाळ बांधवांच्या समस्या, घरकुल योजनांसंबंधी विविध मागण्या घेवुन इसोली, अमडापुर, बोरगाव काकडे, धोत्रा भनगोजी, सवना,रोहडा,अंबाशी, गोदरी, चिखलीसह स्थानिक समाज बांधव एकत्रीत आले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. विद्याधरजी महाले साहेब यांची उपस्थिती लाभली असुन त्याच बरोबर अंकुशराव पडघान पाटील, शिवराज पाटील, हरिदासजी वीर ,दत्ताभाऊ सुसर, गोपीनाथजी लहाने, रोहित खेडेकर इ. मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कडूबा गवारे, गजानन कळंगे,विजय सोरमारे, शिवाजी गायकवाड, गणेश आदबने, शिवाजी देव्हडे, दिपक कळंगे, प्रभाकर जारे,पवन गवारे, मदन गायकवाड, अमर शेळके, सागर खरात, श्रावण भुसारी, शैलेश धारे,प्रदीप हाके,सुभाष विर, रमेश देडे, दत्तात्रय आदबने यांसह अनेक समाज बांधवांनी प्रयत्न केले.