इर्ल्याचे राम गुरुजी व सुनिता चौरे आदर्श माता पिता पुरस्काराने सन्मानित

0
118

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाइन

दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी, सुसंगत फौंडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श माता पिता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ सुधाकर न्हाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्र भरातून २५ आदर्श माता पित्यांची निवड करण्यात आली होती. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील इर्ला गावचे सौ सुनिता व श्री रामचंद्र चौरे यांची निवड हा आकर्षणाचा विषय ठरला.

इर्ल्याचे राम गुरुजी व सुनिता चौरे आदर्श माता पिता पुरस्काराने सन्मानित

रोजंदारीवर काम, ट्रक क्लिनर आणि नंतर शिक्षण घेऊन शिक्षक असा जीवन प्रवास करणाऱ्या राम गुरुजी, व प्रत्येक संघर्षात साथ देणारी त्यांची पत्नी सुनिता यांनी आपल्या मुलांवर शिक्षण आणि संस्कार वाखानन्याजोगे केले आहेत. शिक्षक असलेल्या राम गुरुजींनी हजारो मुलांच्या जीवनात कायापालट करण्यास मदत केली. त्यांच्या विध्यार्थ्यांपैकी काही डॉक्टर, इंजिनीअर, सेना अधिकारी, पोलीस अधिकारी, फार्मासिस्ट तर अनेक शिक्षक बनले. ग्रामीण भागात अविरत अखंडपणे ३१ वर्षे आपली शैक्षणिक सेवा देत साक्षरतेचा प्रसार केला. आदर्श शिक्षकाची कर्तव्य पार पाडत असतानाच त्यांनी आपल्या मुलीला गावातील तसेच शाळेतील पहिली मुलगी डॉक्टर आणि मुलाला इंजिनीअर केले. मुलगी देश विदेशातील अनेक सामाजिक संस्थांनाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. राम गुरुजी नावाने प्रसिद्ध शिक्षक व आदर्श माता पिता सन्मानित सौ सुनिता व श्री रामचंद्र लक्ष्मण चौरे याचा शून्य ते शिखर पर्यंतचा प्रवास आणि कार्य सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे.