Home महाराष्ट्र Gram Panchayat Election 2023 | महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, जाणुन घ्या सविस्तर

Gram Panchayat Election 2023 | महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, जाणुन घ्या सविस्तर

0
Gram Panchayat Election 2023 |   महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, जाणुन घ्या सविस्तर

मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

महाराष्ट्रातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची, 2 हजार 950 सदस्यपदा रिक्त जागांसाठी आणि 130 थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीची निवडणूकीची घोषणा आज करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी ह्या ठिकाणी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया आदी नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल आणि तिथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. आणि 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिक सुचना प्रसिद्ध करतील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here