Home पिंपरी-चिंचवड प्युरीफायर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 17 कामगार बेपत्ता, 7 मृतदेह काढले

प्युरीफायर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 17 कामगार बेपत्ता, 7 मृतदेह काढले

0
प्युरीफायर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 17 कामगार बेपत्ता, 7 मृतदेह काढले

पुणे, 07 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील (Pune Mulshi) एका कंपनीला भीषण आग (Fire) लागली असून या आगीमध्ये मरण पावलेल्या 7 मजुरांचे मृतदेह अद्याप बाहेर काढण्यात आले आहे. 17 कामगार अजूनही बेपत्ता असल्याची (Workers ) महिती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे (Fire Brigade) आठ बंन घटनास्थळी प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, सध्या याठिकाणी कुलिंग करण्याचं काम सुरू आहे.

मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या अरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. वॉटर प्युरिफायर तयार करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीमुळं कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 17 मजूर अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. तर आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रय्तन करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.

आग लागेल्या कंपनीमध्ये वॉटर प्युरिफायरचं उत्पादन केलं जातं. आग मोठ्या प्रमाणावर भडकली त्यामुळं अनेक मजूर आतमध्ये अडकले होते. मात्र आग लागण्याचं नेमकं कारण काय याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आग पूर्ण विझवल्यानंतर याबाबत माहिती मिळू शकणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्या याठिकाणी कुलिंगचं काम केलं जात आहे. याठिकाणी 37 मजूर काम करत होते. त्यापैकी जवळपास 17 अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here