मुंबई – मुंबई अहमदाबाद महामार्गावर तरुणांनी भाईगिरी करत एकास मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओव्हरटेक केल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून यामध्ये या तरुणांनी भर रस्त्यात गाडी थांबवत कारच्या काचा फोडूव व चालकास जबर मारहाण केली. दरम्यान भाईगिरीच्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
ठाण्यातील व्यावसायिक हर्ष पांचाळ हे आपली स्कॉर्पिओ कार घेऊन कामानिमित्त वसई येथे आले होते. ते वसईतून पुन्हा आपल्या घरी परत जात असताना महामार्गावरील सातीवली खिंडीत एम एच 43 BU 0068 या अर्टिगा गाडीतून आलेल्या तीन ते चार अज्ञात तरुणांनी हर्ष यांना जबर मारहाण केली.
ही मारहाण ओव्हरटेक केल्याच्या वादातून केली असून कारच्या काचा फोडून कारचालकाला बेसबॉल स्टिकने मारहाण केली आहे. या प्रकारणी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या त्या तरुणांचा शोध घेत आहेत.