धुळे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
साक्री येथे कार्यरत असणाऱ्या भूमी अभिलेख उपअधिक्षक श्री.म.सी.गाडगे नामक अधिकाऱ्याने धार्मिक तेढ निर्माण करणे/महिला कर्मचाऱयांना त्रास देणे/कर्मचारी वर्गासहित अधिकारी वर्गाला त्रास देणे असे प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होते याला वाचा फोडून साक्री/धुळे येथील सामाजिक/राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पक्षीय पदाधिकारी वर्गाने प्रशासनास निवेदन देऊन गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले या अधिकाऱ्यावर या अगोदरही डी. ई ची केस/महिला आयोगातील केस अश्या कितीतरी तक्रारी दाखल आहेत ह्या अधिकाऱ्याने संबंध महाराष्ट्रातील भूमी अभिलेख शाखा बदनाम करून एक कुआदर्श प्रस्थापित केला आहे.
‘समाज स्तरावर यांच्या बदलीचे स्वागत जरी होत असले तरी, अश्या अधिकाऱ्यावर निलंबन/बडतर्फी अश्या कठोर कार्यवाही करून राज्य शासनाने एक आदर्श प्रस्थापित करावा अशी मागणी सामाजिक-राजकीय संघटनामार्फत केली जात आहे

या संदर्भात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले, भाजप सहकार आघाडीचे नाशिक विभाग संयोजक योगेशजी भामरे, भाजप भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, साक्री तालुका मंडळ अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष इंजि. मोहन सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष राकेशजी दहिते, साक्री तालुका युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष शिवाजी देवरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख राकेश अहिरराव, साक्री शहर प्रसिद्धी प्रमुख विनोद पाटील, पं. स. उपसभापती ऍड. नरेंद्र मराठे, मनसेचे धिरज देसले, शिवसेना तालुका संघटक चंदूआबा देवरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रज्योत देसले, शिवप्रतिष्ठाणचे धनराज चौधरी, शितल सनेर, श्रीसाई ग्रुपचे अजय सोनवणे सह सामाजिक संघटना विश्व हिंदू परिषद/बजरंग दल/साई सेव्हन ग्रुप,साक्री/शिवशक्ती सांस्कृतिक मित्र मंडळ यांनी केली आहे.
आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved