Home देश-विदेश रामजन्मभूमी ट्रस्ट जमीन व्यवहार संबंधी आरोपांचे सत्य..

रामजन्मभूमी ट्रस्ट जमीन व्यवहार संबंधी आरोपांचे सत्य..

0
रामजन्मभूमी ट्रस्ट जमीन व्यवहार संबंधी आरोपांचे सत्य..

पुणे | शासननामा न्यूज ऑनलाईन

– कल्पेश जोशी , सोयगांव
kavesh37@yahoo.com

रामजन्मभूमी ट्रस्ट जमीन व्यवहार संबंधी आरोपांचे सत्य

रामजन्मभूमी ट्रस्टवर समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी ट्रस्ट जास्त किमतीत जमीन खरेदी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की कुसुम पाठक या महिलेची जमीन सुलतान अन्सारी या व्यक्तीला 2 कोटी रुपयात विकली परंतु रामजन्मभूमी ट्रस्ट ने मात्र हीच जमीन त्याच दिवशी 18.5 कोटी रुपयात खरेदी केली.

असे का? तर यातून संशय असा पेरायचा आहे की रामजन्मभूमी ट्रस्ट जास्त किंमत देऊन जमीन खरेदी करत आहे, त्यामुळे यामागे काहीतरी काळंबेरं आहे. काहीतरी घोटाळा सुरू आहे.

परंतु जमीन खरेदी विक्री व्यवहार केलेली कोणतीही व्यक्ती या आरोपाला सहज निराधार सिद्ध करू शकते. कारण, असे की या प्रकरणातील पहिली व्यक्ती कुसुम पाठक यांनी रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागण्याच्या अगोदर सुलतान अन्सारी आणि अन्य 18 पार्टनरसोबत 2019 मध्ये जमीन विक्रीचा एक करार केला होता. त्या करारानुसार 17 ऑक्टोबर 2019 रोजी 2 कोटी रुपयात हा व्यवहार ठरला होता. सगळीकडे बिल्डर सुद्धा सर्व सामान्यपणे असाच व्यवहार करतात. एखादी जमीन ते गुंतवून ठेवतात आणि नंतर जमिनीचा भाव वाढल्यानंतर आणि कस्टमर मिळाल्यावर ती त्याला विकतात. हे प्रकरण तसेच आहे.

या उपरोक्त जमीन व्यवहार प्रकरणात ट्विस्ट आला सुप्रिम कोर्टाने राम मंदिराचा अंतिम निकाल दिल्यानंतर. 9 नोव्हेंबर 2019 रोजी हा ऐतिहासिक निकाल लागल्यानंतर स्वाभाविकच तिथे भव्य राम मंदिर निर्माण होईल हे सगळ्यांनाच ठाऊक होते. त्यामुळे हा निकाल लागल्याबरोबर अयोध्येतील जमिनीची भाव वाढले. राम मंदिर उभारणीसाठी काही जमीन अधिक लागणार होती म्हणून जमीन खरेदी प्रक्रिया सुरू झाली.

याच दरम्यान सुलतान अन्सारी पर्यंत रामजन्मभूमी ट्रस्ट कडून स्वाभाविकपणे जमीन खरेदीसाठी प्रस्ताव आला असणार. ज्या कुसुम पाठक आणि सुलतान अन्सारी यांच्यात पूर्वी 2 कोटींचा करार झाला होता, त्यानुसार 18 मार्च 2021 रोजी सुलतान अन्सारीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती जमीन अगोदर आपल्या नावे केली आणि त्याच दिवशी दुसरा व्यवहार करून तीच जमीन 18.5 कोटी रुपयात वर्तमान बाजारभावानुसार रामजन्मभूमी ट्रस्टला विक्री केली. रेल्वे स्टेशन परिसरात ही जमीन असल्या कारणाने तिचे भाव साहजिकच जास्त वाढले आहे.

ही सर्व प्रक्रिया वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की ही तर सर्वसामान्य जमीन व्यवहार प्रक्रिया आहे. आरोप करणाऱ्यांनी 18 मार्च 2021 रोजी झालेल्या व्यवहाराचेच तेवढे फोटो व्हायरल केलेत, पण 2019 मध्ये पाठक आणि अन्सारी यांच्यात झालेल्या कराराचे फोटो टाकले नाहीत. यावरून घोटाळा कोण करतंय हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे रामजन्मभूमी ट्रस्टवर केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही हेच सत्य आहे.

रामजन्मभूमी ट्रस्ट चे महासचिव श्री चंपतराय यांनी एका प्रेसनोट द्वारे हे आरोप खोटे असून राजकीय वैमनस्यातून होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. रामजन्मभूमी ट्रस्ट जमीन खरेदी व्यवहार कायदेशीर प्रक्रियेने पूर्ण करत असून आपसी सहमतीने करत असल्याचंही सांगितले आहे.

मग असे आरोप का? तर पुढील काही महिन्यात उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूका आहेत. या निवडणुकात भाजपला आणि योगी आदित्यनाथ यांना राम मंदिर या फॅक्टरमुळे खूप फायदा होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी त्या फॅक्टरवरच हल्ला करून जनमनात संभ्रम व गैरसमज निर्माण करून राजकिय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. हा नुकताच झालेला आरोप त्याचाच भाग आहे. त्यामुळे पुढील काळात असे अनेक प्रकार समोर येऊ शकतात, जागृत समाज म्हणून आपण याकडे डोळसपणे पहायचे आहे. अफवा व अप प्रचारांना आपण बळी पडणार नाही.

सदर बाबतीत हिंदू धर्म संस्कृतिला मुद्दाम बदनाम करण्यात येत आहे तरी सदर प्रकरणाचे कागदपत्रे शासननामा न्यूज कडे आहेत कुणीही हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या राजकारण्यांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहिती करिता shasannama@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here