पुणे, 08 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
पुण्यामध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये 18 निष्पापांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत (Pune Mulashi Fire) 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे. ही आग इतकी भीषण होती की या आगीत ज्या 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे DNA टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान या आगीमध्ये सापडल्याने मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं समोर आली आहेत, कंपनीकडून ही नाव देण्यात आली आहेत. अद्याप अठरावं नाव समोर आलेलं नाही.
मृतांची नावं- अर्चना कवाळे, सचिन घोडके, संगीता गोंदे, मंगल मरगळे, सुरेखा तुपे, सुमन फेबे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी आंबरे, मंदा कुलाट, त्रिशला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपाकर, सारीका कुडले, धनश्री शेलार. ही त्या 17 मृतांची नावं असून अद्याप एका व्यक्तीचं नाव समजलेलं नाही. त्याबाबत माहिती मिळवली जात आहे.