मुंबई – मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरफीच्या तुकड्या अथक परिश्रम घेत आहेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 24, 2021
आतापर्यंत एनडीआरएफच्या मदतीमुळे अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका झाली. पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना मनसे राज ठाकरे यांनी धीर दिला आहे. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसेकडून मदतीचं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना पुरग्रस्तांना मदत करतांना दिसत नसल्यावरून कान उघाडणी केली आहे. लोकं ज्यांना आयडॉल मानतात ते कलाकार मंडळी या मदतकार्यात कुठेही दिसत नाहीत. असं म्हणत त्यांनी बॉलीवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे.
अमेय खोपकर म्हणाले
‘इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं… अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत… अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.