Home महाराष्ट्र कोकण कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

0
कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

पनवेलः कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. मुंबई ईडी झोन-२चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून ताब्यात घेतले आहे. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर आज पाटील यांना अटक करण्या आली. (Former MLA Vivek Patil arrested by ED in Karnala Bank scam case)

कर्नाळा बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते. पनवेल संघर्ष समितीने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.



रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे.

पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुराव्याचा रेटा लावला होता. त्यानुसार सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पूर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे.



सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती.

राज्याच्या ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांची भेट घेवून संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी करून संबंधित घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुशील कुमार यांनी गुन्ह्याचा तपास झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता. सध्या महत्वाचे गुन्हे तपासासाठी असल्याने दोन त तीन महिन्यात ही केस दाखल करण्यात येईल, असे आश्‍वासन सुशिल कुमार यांनी कांतीलाल कडू यांना दिले होते. आज मंगळवारी (ता. १५) सुनील कुमार यांनी विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे.



कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्र्यरित्या तपास करणार असल्याने आता कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पनवेल संघर्ष समितीच्या कर्नाळा बँक लढ्याला मोठे यश आले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here