Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कै. मा. आमदार गणपतराव आबासाहेब देशमुख म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह- पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे!!

कै. मा. आमदार गणपतराव आबासाहेब देशमुख म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह- पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे!!

0
कै. मा. आमदार गणपतराव आबासाहेब देशमुख म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह- पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे!!


सांगोला (संपादक: सोमनाथ देवकाते) : शासननामा न्यूज ऑनलाईन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नुकतेच सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेत निवडून गेले होते. द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार देशमुख यांनी मोडला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते. त्यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे नेतृत्व केले.गणपतराव आबासाहेब देशमुख म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह होते असे खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी म्हटले आहे.

कै. मा. आमदार गणपतराव आबासाहेब देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे यांनी सांत्वन पर भेट दिली या वेळी ते बोलत होते. दिल्लीत संसदेचे अधिवेशन चालू असल्या कारणाने अंत्यदर्शनासाठी उपस्थित रहाता आले नाही असे ही खासदार महात्मे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पोपटराव गणपतराव देशमुख, चंद्रकांत दादा देशमुख, रतन काकी गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले

डॉ. विकास महात्मे यांनी कै. विजय जानकर (जिल्हा अध्यक्ष: धनगर समाज संघर्ष समिती, सोलापूर) शिवणी (सांगोला) व कै. कृष्णाजी शेळके (धनगर समाज संघर्ष समिती, कोल्हापूर) यांच्या  परिवाराची भेट घेतली.

यावेळी अनंत बनसोडे (जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती, परभणी) , प्रमोद परदेशी (प्रदेश प्रसिद्धी प्रमुख: भाजप भटके विमुक्त आघाडी), कृषिभूषण अंकुश पडवळे, नागेश बिचुकले (यशवंत सेना ता अध्यक्ष) , तानाजी वाघमोडे (जि.प. सदस्य पंढरपूर) बबनराव जानकर (मा जि.प. सदस्य), शशिकांत कांबळे (सरपंच शिवणे), के एस माळी, प्रा संतोष कोळेकर, दादासाहेब कोळेकर, बाबासाहेब अनुसे, जांबुराव शेळके, विकास घागरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here