Gold Silver Price Today : आज पुन्हा एकदा सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच चांदीच्या दरांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. मॉनेटरी पॉलिसीबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीपूर्वी रुपयाच्या तुलनेत पुन्हा एकदा डॉलरचे दर वाढलेआहेत. त्यानंतर भारतात सोन्याच्या भावांमध्ये पुन्हा एकदा घट पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,730 रुपये प्रति दहा ग्रॅमची नोंद झाली आहे.
तसेच, सोमवारी चांदीच्या दरांमध्ये काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज चांदीचा दर 900 रुपयांच्या वाढीसह 72,300 रुपये प्रति किलोग्राम नोंदवण्यात आला आहे. तर शुक्रवारी बाजारात सिल्वरची किंमत 71,400 रुपये प्रति किलोग्राम नोंदवण्यात आली होती.
देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर काय?
गुड रिटर्न्स वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,890 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवण्यात आली आहे. तसेच चेन्नईमध्ये याची किंमत 46,060 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,730 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली आहे.
तसेच, आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीतही घट झाल्याचं पाहायला मिळालं. 150 रुपयांच्या नुकसानासह आज याची किंमत 48,730 रुपये प्रति दहा ग्राम नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी 24 कॅऱेट सोन्याची किंमत 48,880 रूपये प्रति दहा ग्राम होती.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.