नागपूर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग जी कोश्यारी यांनी सोमलवाडा नागपूर येथे रविवार दि. १३ जून ला महात्मे आय बँक आय हॉस्पिटल ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राज्यसभा खासदार व पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी रुग्णालयाच्या सर्व विभागांचे कुतूहलाने अवलोकन केले.
१९८६ पासून एस. एम. एम. आय वेलफेअर चारीटेबल ट्रस्ट द्वारा संचालित हे नेत्र रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था ,समाजसेवेचे व्रत अविरत चालवीत आहे. लाखो लोकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार संस्था करीत आहे याबद्दल त्यांनी कौतुक केले. रुग्णालयातील सहयोगी, विद्यार्थी यांचेशी त्यांनी संवाद साधला व डॉक्टर – रुग्ण या विषयावर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नीतिमत्तेबद्दल ही उदबोधन केले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सर्वश्री मधुकरराव काळमेघ, अनिल वैरागडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कानडे, डॉ. निखिलेश वैरागडे व इतर उपस्थित होते.