महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या पुतळ्याचे येवला नगरीत भव्य स्वागत

0
79

नाशिक (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

इंग्रजा विरूद्ध पहिला बंड करणारे प्रथम सेनानी, इतिहासकारांनी ज्यांना जाणुनबुजून दुर्लक्षीत ठेवले असा महान योध्दा श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात भव्य स्वागत करण्यात आले.
दि ७ पासुन पुना ते इंदोर या राजमार्गाने महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याची शौर्य यात्रा काढण्यात आली आहे.

महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या पुतळ्याचे येवला नगरीत भव्य स्वागत

ही शौर्य यात्रेचे आगमन दि १० मे रोजी येवला शहरात झाले. यावेळी ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी येवला तालुक्यातील नागरीकांच्या वतीने पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
विंचुर चौफुली येथे जेसीबीच्या साहाय्याने बेल भंडारा उधळण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, घोड्यांवर स्वार झालेले तरूण मावळ्यांची वेषभुषा केली होती. यावेळी विंचुर चौफुलीवर काही काळ ट्राफीक जाम होती.

या मिरवणुकीत विजय हाके,धनगर समाजाचे नेते बापूसाहेब शिंदे, दत्तात्रय वैद्य, गणपतराव कांदळकर, गोरखशेठ सैंद्रे, सुदाम लोंढे, मुकुंद राजे होळकर, आ.भुजबळांचे स्वियसहाय्यक लोखंडे, मा नगरसेवक पप्पु सस्कर, बबनराव साळे,गणेश गायकवाड, मच्छिंद्र बीडगर,अजय वन्से, किरण थोरात, दत्तात्रय देवरे, राजेंद्र परदेशी, प्रविण जानराव, दिपक सैंद्रै, , एकनाथ सोनवणे, मच्छिंद्र रोकडे, गोपीनाथ सोनवणे, राणुबा जाधव, भिकानाना जाधव, एकनाथ जाधव, तुषार जाधव, नवनीत वजीरे, समाधान बागल, मच्छिंद्र रोकडे, बाबुराव हिंगे, सोमनाथ मोहिते, नाना मोगरे, आण्णा सापनर, शरद राऊळ, रामभाऊ राशीनकर, अनिल वरे, विकी वैद्य, भैय्या राशीनकर, कृष्णा कवात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

शौर्य यात्रेचे नियोजन इंदोर चे मा. स्वप्निलराजे होळकर,मा.नगरसेवक सुधीर देडगे आणि त्यांचे सहकारी करीत होते.