Home महाराष्ट्र Gulshan Kumar murder case: गुलशन कुमार हत्याकांड: मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल – gulshan kumar murder case: bombay hc upholds raut merchant’s conviction, upholds acquittal of ramesh taurani

Gulshan Kumar murder case: गुलशन कुमार हत्याकांड: मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल – gulshan kumar murder case: bombay hc upholds raut merchant’s conviction, upholds acquittal of ramesh taurani

0
Gulshan Kumar murder case: गुलशन कुमार हत्याकांड: मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल – gulshan kumar murder case: bombay hc upholds raut merchant’s conviction, upholds acquittal of ramesh taurani

[ad_1]

हायलाइट्स:

  • गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
  • अब्दुल रौफ आणि अब्दुल रशिद या दोन भावांना जन्मठेप
  • ‘टीप्स’चे मालक रमेश तौरानी यांना कोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई: ‘कॅसेटकिंग’ गुलशन कुमार यांच्या हत्याकांडातील दोषी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. रौफचे एकूण वर्तन पाहता तो दयेस पात्र नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तर, रौफचा भाऊ रशीद मर्चट यालाही दोषी धरत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आलेले ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांना मात्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. (Bombay High Court Verdict in Gulshan Kumar Murder Case)

टी सिरीजचे गुलशन कुमार यांची १९९७ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला विशेष मोक्का कोर्टाने २००२ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात त्याने लगेचच मुंबई हायकोर्टात अपिल केले. एप्रिल २००९ मध्ये कुटुंबीयांना भेटण्यासाठी काही दिवसांसाठी त्याला फर्लोवर सोडण्यात आले होते. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन तो फरार झाला होता. तो शेजारच्या बांग्लादेशमध्ये पळून गेला होता. सीमाभागात घुसखोरी केली म्हणून बांग्लादेशमधील पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तेथील कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांग्लादेशमधील कोर्टाने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यानंतर विशेष मोक्का कोर्टाने मर्चंटला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात पाठवले होते.

वाचा: ‘मनुवाद अजूनही संपलेला नाही; सावध पावलं टाकायला हवीत’

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं १९ पैकी १८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यात ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश होता. या निर्णयाला राज्य सरकारनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. तेव्हा, तौरानी यांना न्यायालयानं दिलासा देत त्यांच्या विरोधातील राज्य सरकारचं अपील फेटाळून लावलं. तर आणखी एक निर्दोष आरोपी अब्दुल रशीद दाऊद मर्चंट विरोधातील अपील अंशत: मान्य करत त्याला शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार त्याला तात्काळ सेशन्स कोर्टात किंवा अंधेरीमधील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात शरण जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसंच, पासपोर्टही पोलिसांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. अब्दुल रशीद शरण न आल्यास त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढून त्याला अटक करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

वाचा: ‘तुम्ही एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही’

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here