महाराष्ट्राच्या राजकारातील दोन दिग्गज… देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

0
106

संपादक (सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

महाराष्ट्राला महान नेत्यांची परंपरा आहे म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांच्या नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मान असतो, त्या महान परंपरेतील आजच्या काळातील राज्याचे राजकारणी म्हणजे देवेन्द्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार दोन्ही नेत्यांना मोठा राजकीय वारसा मिळाला पण मोठ्या राजकीय वारसा बरोबर मोठी जबाबदारीही असते ती जबाबदारी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविणारे हे दोन्ही नेते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ध्रुव.

साखर कारखान्यापासून राजकारणाला सुरुवात करून गेली ३८ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजवणारे तब्बल सात वेळा विधानसभा जिंकणारे अजितदादा म्हणजे प्रचंड ऊर्जा असलेला नेता स्पष्टवक्ता, वक्तशीर, दिलेला शब्द पाळणारा आणि अलीकडच्या काळात दिसलेला स्वभाव म्हणजे भावनीक सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणजे अजितदादा.

वयाच्या २१ व्या वर्षी महापौर पाच वेळा विधानसभा जिंकणारे आपल्या वक्तृत्व आणि आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने,’राजकारणातील राजहंस’, महाराष्ट्राचे संवेदनशील, अभ्यासू, सक्षम नेतृत्व, सबंध महाराष्ट्राचे अल्पावधीतच लक्ष वेधून घेणारा नेता म्हणजे माजी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत सुरुवातीला नवखे वाटणारे देवेन्द्रजी पाच वर्षात कार्यकाळात दिल्लीलही अंदाज न येणारे कर्तृत्व सिद्ध करून दाखवून दिले की राजकारणात मक्तेदारी पेक्षा कर्तृत्वाने मोठे होता येत याचे उदा. म्हणजे शेतकऱ्यांचा संप असो वा एखादे आंदोलन असो.


अजितदादा व देवेन्द्रजी हे दोन परस्पर विरोधी पक्षातले नेते पण यांची मैत्रीसुद्धा जाहीर आहे त्या मैत्रीचा एक पैलू महाराष्ट्राने नुकताच बघितला आहे.

या नेत्यांची अनेक विषयावर वेगवेगळी मते असली तरी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मिळाले पाहिजे या विषयावर दोघांचेही एक मत आहे या दोनहि प्रश्नांची सोडवणूक या नेत्यांकडून होईल या अपेक्षेसह दोनहि नेत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!