
कल्याण (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे/ मुंबई तर्फे कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील समाज बांधवांनी पुण्यश्लोक राजमाताआहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष तसेच ठाणे आणि पालघर जिल्हा हिवताप निर्मुलन पतसंस्थेचे सचिव अरुण फत्तु परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी उपस्थित होते, तसेच कार्याध्यक्ष राजेंद्र परदेशी ( पपीनाना), सचिव दिपक परदेशी, सदस्य रमेश आबा निमंत्रीत सदस्य सदानंद परदेशी, भगवान यादव, तसेच शिक्षक ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष राहुल परदेशी, भाजपा ओबीसी मोर्चा चे सहसंघटक योगेश परदेशी, भटके विमुक्त आघाडीचे गिरीष परदेशी, केंद्र प्रमुख संजय धनगर युवा शिक्षक मित्र आशिष परदेशी, महेंद्र गोकुळ , युवा समाजसेवक योगेश गोटु परदेशी व कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्ह्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक अशोकराव चोरमले, महिला संयोजिका डॉ उज्ज्वलाताई हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा माजी नगरसेविका मीना ढोले, पश्चिम म. युवा सहसंयोजक संतोष जाणकर, भाजप युवा मोर्चा पुणे शहर चिटणीस ओंकार डवरी उपस्थित होते.