Home महाराष्ट्र शिवसेनेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

0
शिवसेनेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | शासननामा न्यूज ऑनलाईन :

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपआपल्या पक्षकारांची बाजू मांडली. यावेळी शिंदे गटाने आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच मिळाले नसल्याचं सांगत ही कागदपत्रे मिळावीत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतही मिळावी अशी मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांनी मीडियासमोर बोलताना दावे प्रतिदावे केले आहेत. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मीडियाशी संवाद साधून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी बोलताना अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. मी ज्युडिशिअल ऑथेरिटी म्हणून काम करत असतो. त्यामुळे त्यावर बाहेर बोलणं योग्य नाही. ज्यांना आरोप करायचे त्यांना करू दे, अशा शब्दात राहुल नार्वेकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. न्याय प्रविष्ट विषयात बोलणं योग्य नाही. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसारच निर्णय दिला जाईल. संविधानातील तरतुदींचं पालन करून योग्य निर्णय घेऊ. प्रक्रियेचं पालन करू. पुढच्या सुनावणीबाबत योग्य निर्णय घेऊन याचिकाकर्त्यांना सांगू, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here