Home महाराष्ट्र नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी

0
नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी

नाशिक: नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली मात्र या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केलं. या नामकरणावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे .Navi Mumbai Airport Issue: If it was Balasaheb Thackeray, he would have denied the name of the airport; Chhagan Bhujbal

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं, असं वक्तव्य करत त्यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं आहे.

छगन भुजबळ यांनी  पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चं नाव विमानतळाला देणं नाकारलं असतं. जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला सूचवलं असतं, असं सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मात्र, हे सांगतानाच बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळ यांनी थेट नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सुनावले आहे . त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Navi Mumbai Airport Issue: If it was Balasaheb Thackeray, he would have denied the name of the airport; Chhagan Bhujbal

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here