
पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
चिखली: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सारसबाग पुणे येथील स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कार्यवाही करावी याकरीता सकल हिंदू समाज चिखली तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
सबंध भारतभर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श राज्यकारभार सर्वश्रुत आहे. या राष्ट्राचा सांस्कृतिक पाया त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे टिकून आहे. पुणे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीशिल्पा मधे महादेवाची पिंड हातात असलेल्या शिल्पाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे सह संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान केला गेलेला आहे यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर संबंधित समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर करावी यासाठी आज चिखली येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
यावेळी गजानन कळंगे, नारायण जारे, सागर खरात, शैलेश धारे, गणेश चव्हाण, कडूबा गवारे, रामकृष्ण सोरमारे, सुरेश सोरमारे, प्रकाश शेळके, आनंदा कळंगे,अभिषेक वीर, श्रावण भुसारी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.