नवी दिल्ली : भारतीय नौदलात नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पात्र उमेदवारांची ज्वॉइन इंडियन नेव्हीतर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी चांगले पॅकेजही देण्यात येणार आहे. नौदल भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून यानुसार 50 पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना इंडियन नेव्हीच्या अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल.
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2021 पासून सुरू झाली आहे. अर्जाची अंतिम तिथी 26 जून 2021 आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करायचा असल्यास joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना विशेष काळजी घ्यावी, कारण चूक झाल्यास अर्ज रद्द केले जाऊ शकतात.
असा करा अर्ज
- सर्वप्रथम joinindiannavy.gov.in वर भेट द्या.
- यावर करियर अँड जॉब्स पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर एक्झ्यूक्यूटिव्ह पर्यायवर क्लिक करा.
- यात Register with Aadhaar Virtual ID वर क्लिक करा.
- यानंतर नोंदणीतील संपूर्ण माहिती भरा.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याची खातरजमा करून अर्ज सबमिट करा.
अशी आहे पात्रता
भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार केवळ पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई किंवा बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मात्र, उमेदवारांनी 60 टक्के गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
वेतनमान
भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना स्तर लेव्हल 10 नुसार 56,100 ते 1,10,700 पगार देण्यात येणार आहे.
Indian Navy Recruitment 2021 Short Service Commission Officer Vacancy How To apply Read Details