[ad_1]
हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची हमी देतानाच केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
- केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. त्यांना कोणतेही कायदे करू द्या, मात्र शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे.
- राज्यातील शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
राज्यातील शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे. शेतकरी हाच राज्याचे वैभव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा गौरव केला आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अन्नदाता आणि जीवनदाता एकच आहेत, असे सांगतानाच राज्यावर आर्थिक संकट असतानाही हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
राज्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच प्रयोग करत राहिले पाहिजे. शेतकऱ्याने यासाठी प्रयोगशील होणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण दिले. उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने जपानमधील आंबा पिकवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी प्रयोगशील होणे आवश्यक असून शेतकऱ्यांच्या प्रयोगासाठी महाविकास आघाडी सरकार मदत करेल, शेतीक्षेत्रासाठी जे जे काही करता येईल ते ते आम्ही करू, असे ठाकरे पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- आता मुस्लिम आरक्षणाची लढाई; वंचित बहुजन आघाडीचा ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा
राज्यातील शेतकरी कायमचा चिंतामुक्त व्हायला हवा आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये, असे सांगतानाच ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्या दिवशी राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
‘हमीभाव नको, हमखास भाव हवा’
राज्यातील शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वेळोवेळी नैसर्गिक संकटे येत असतात. सोन्यासारखी पीके या नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असतात. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले हे थोडक्यात सांगितले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही आमच्या कामकाजाची सुरुवातच पीक कर्ज मुक्तीपासून केली याची त्यांनी आठवण करून दिली. यानंतर राज्यावर कोरोनाचे संकट आले. अशा परिस्थित शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. हे त्याचे योगदान म्हणजेच त्याचे उपकार विसरता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या गणेशमूर्तींनाच परवानगी
[ad_2]
Source link