Home देश-विदेश बापरे, घरातील फ्रिज ब्लॅक फंगसचे कारण? म्यूकोरमायकोसिसबाबत AIIMSचा धक्कादायक खुलासा!

बापरे, घरातील फ्रिज ब्लॅक फंगसचे कारण? म्यूकोरमायकोसिसबाबत AIIMSचा धक्कादायक खुलासा!

0
बापरे, घरातील फ्रिज ब्लॅक फंगसचे कारण? म्यूकोरमायकोसिसबाबत AIIMSचा धक्कादायक खुलासा!
कोरोना विषाणूची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. लसीकरणाने देखील वेग घेतला असून कोरोनाचा (corona virus) धोका आता कमी होताना दिसत आहे. पण एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असताना दुसरीकडे देशामध्ये अचानक म्यूकोरमाइकोसिसचा (mucormycosis) धोका वाढताना दिसत आहेत. म्यूकोरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस अर्थात काळी बुरशीचा (black fungus) आजार होय. या आजाराने सध्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवली असून वाढणारी रुग्णसंख्या नव्या संकटाची चाहूल देत आहेत.

डॉक्टरांच्या निष्कर्षानुसार ब्लॅक फंगसचे कारण स्टेरॉइड आणि डायबिटीज आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडीयावर देखील कोरोना होऊन गेलेल्यांना ब्लॅक फंगस होत असल्याच्या पोस्ट अधिकाधिक व्हायरल होत आहेत. अजून एका प्रकारची पोस्त सोशल मीडीयावर फिरताना दिसत आहे की घरात ठेवलेल्या कांद्याच्या माध्यमातून सुद्धा ब्लॅक फंगस पसरत आहे. यामुळे लोकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण आहे. पण हे खरेच आहे का? चला जाणून घेऊया यामागचे सत्य!

फंगस साठी कांदा दोषी

सोशल मीडीयावर दरोरोज नवनवीन पोस्ट व्हायरल होत असतात. यापैकीच एका पोस्ट मध्ये हा दावा करण्यात आला आहे की कांदा खरेदी करताना विशेष काळजी घ्या कारण कांदा हा ब्लॅक फंगसच्या संक्रमणाचे कारण बनला आहे, बाजारातून आणलेला कांदा देखील फ्रीज मध्ये स्टोअर करताना खबरदारी बाळगावी असे सांगितले जात आहे. कांद्याच्या बाहेरील आवरणावर सामान्यत: आढळणारा भाग हा म्यूकोरमायकोसिसचा कारण बनू शकतो. म्हणून ज्या कांद्यावर तुम्हाला काळ्या बुरशी सारखा भाग दिसेल तो भाग त्वरित काढून टाकावा किंवा तो कांदा वापरू नये असे आव्हान या पोस्ट मधून करण्यात येत आहे.

फ्रीजचा काळा रबर देखील करू शकतो संक्रमण

पोस्ट मधून असेही सांगण्यात आले आहे की फ्रीजच्या आत रबर वर काळा भाग निर्माण झाल्यास तो सुद्धा ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकतो. एकंदरीत या पोस्ट मधून हे सांगण्यात येत आहे की फ्रीजच्या माध्यामतून खाद्यपदार्थांवर आणि त्यातून शरीरात ब्लॅक फंगस प्रवेश करू शकतो. काही लोक फळे आणि भाज्या यांवर असणारे काळे डाग देखील ब्लॅक फंगसला कारणीभूत ठरत असल्याचे समजत आहेत. पण या सर्व गोष्टी खरंच खऱ्या आहेत का? चला जाणून घेऊया.

डॉक्टरांचे काय म्हणणे आहे?

कांद्यावरील फंगस बाबत जेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारले तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी अयोग्य आणि अफवा असल्याचे सांगितले आहे, देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि होमिओपॅथी मेडिकल असोसिएशनचे सदस्य एन.सी.पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की कांद्यामधून ब्लॅक फंगसचे संक्रमण होत नाही. त्यांनी म्हटले की भाज्यांवर असणारी काळी बुरशी ही वेगळ्या प्रकारची असते. यातून होणारे संक्रमण हे जीवघेणे नसते. भाज्यांवर दिसणारे काळे डाग आणि बुरशी ही संक्रमक नसते. त्यामुळे आरोग्याला जास्त धोका नसतो. मात्र असे असले तरी असे भाग खाऊ नयेत आणि भाज्या नेहमी धुवून, स्वच्छ करूनच वापराव्यात हे त्यांनी स्पष्ट केले.

AIIMS ने देखील स्पष्ट केले आपले मत

aiims-

म्यूकोरमायकोसिसच्या या विचित्र दाव्यावर आपली प्रतिक्रिया देताना AIIMS चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की कोविडची लागण झालेल्या रूग्णांमधील काळ्या बुरशीचे संक्रमण रोखण्यासाठी शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित करणे आवश्यक आहे. म्यूकोरमायकोसीस बद्दल मत मांडताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणले की म्यूकोरमायकोसीसचा शब्दश: अर्थ काळी बुरशी असा नाही. ही एक अफवा पसरली आहे. जेव्हा म्यूकोरमायकोसीसचे संक्रमण होते तेव्हा रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णाची त्वचा हळूहळू फिकट पडू लागते आणि काळी दिसू लागते. म्हणून याला काळी बुरशी असे म्हणतात. त्याचा आणि बाहेरील पदार्थांवर वा वस्तूंवर दिसणाऱ्या काळ्या बुरशीशी संबंध नाही.

स्टेरॉइड आणि साखरेवर नियंत्रण

गुलेरिया यांनी सांगितले की जर एखादा रुग्ण खूप काळापासून स्टेरॉइड घेत असेल आणि शिवाय तो मधुमेहाने सुद्धा ग्रस्त असेल तर त्याला म्यूकोरमायकोसिस होऊ शकतो. AIIMS चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांचा असा सल्ला आहे की याचा धोका कमी करण्यासाठी साखर आणि तत्सम गोड पदार्थांचे सेवन कमी करावे. याशिवाय स्टेरॉइड वापर देखील गरज असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. लगेच स्टेरॉइड रुग्णाला देऊ नये. कारण काही आकडेवारी अशी आहे जी हे दर्शवते की स्टेरॉयइचा अधिक वापर केल्याने विषाणू आणि बुरशीचे शरीरात संक्रमण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here