जळगाव (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
माहिती अधिकारात मागवलेली माहिती वेळेत न मिळाल्याने सवर माहिती देण्यासाठी 2500 रुपये लाच घेताना (Accepting Bribe) ग्रामसेवकाला (Gramsevak) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. अनिल नारायण गायकवाड (Anil Narayan Gaikwad) (वय-50 रा. चहार्डी, ता. चोपडा जि. जळगाव) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. जळगाव एसीबीने (Jalgaon ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.26) धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे केली.
याबाबत धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील 49 वर्षीय व्यक्तीने जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी आहेत. त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांच्याकडे सदर ग्रामपंचायती मध्ये सन 2015 ते 2020 या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा (Right to Information) अर्ज करून मागितलेली होती.
ही माहिती वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सवर माहिती देण्याच्या मोबदल्यात गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 2500 रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता प्रथम तीन हजार रुपये व तडजोडीअंती 2500 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना अनिल गायकवाड यांना रंगेहात पकडण्यात आले. गायकवाड यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात (Dharangaon Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील (DySP Shashikant Patil), पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav), एन.एन. जाधव (Police Inspector N.N. Jadhav) पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस अंमलदार बाळू मराठे, ईश्वर धनगर, सुरेश पाटील, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.