Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र शिवसेनेची डोकेदुखी वाढली; संजय राऊतांच्या बैठकीला ‘ते’ नगरसेवक गैरहजर

शिवसेनेची डोकेदुखी वाढली; संजय राऊतांच्या बैठकीला ‘ते’ नगरसेवक गैरहजर

0
शिवसेनेची डोकेदुखी वाढली; संजय राऊतांच्या बैठकीला ‘ते’ नगरसेवक गैरहजर

जळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्या जळगाव दौऱ्यावेळी पक्षाची डोकेदुखी वाढवणारी घडामोड घडली आहे. जळगाव जिल्ह्यात आज शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या शिवसेना महानगरच्या बैठकीस नुकतेच सेनेत दाखल झालेले भाजपचे बंडखोर व नवग्रह मंडळाच्या सदस्यांनी दांडी मारल्याने ऐन संघटनात्मक बैठकीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली.

महापालिकेत भाजपला धक्का देत ऐतिहासिक सत्तांतर घडवल्यानंतर शिवसेनेचा महापौर निवडून आला. मात्र, त्यानतंर शिवसेनेतील गटबाजीला सुरुवात झाली आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगाव शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेण्यासाठी आलेल्या सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षातील मतभेत चव्हाट्यावर आले.

या बैठकीत भाजपचे अजून काही नगरसेवक पक्षात दाखल होतील अशी चर्चा असताना जे नगरसेवक भाजपमधून फुटून शिवसेनेत आले होते, त्यातील उपमहापौर कुलभूषण पाटील वगळता बहुसंख्य नगरसेवक या बैठकीला अनुपस्थितीत होते.

भाजपमधून सेनेत दाखल झालेल्या ३० नगरसेवकांपैकी केवळ उपमहापौर कुलभुषण पाटील, प्रा.सचिन पाटील, ज्योती चव्हाण यांनीच या बैठकीत हजेरी लावली.

कोणत्या नगरसेवकांची बैठकीला दांडी?

भाजपची सत्ता जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या नवग्रह मंडळातील नगरसेवकांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली होती. नवग्रह मंडळातील केवळ उपमहापौर कुलभूषण पाटील एकटेच उपस्थित होते. नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, किशोर बाविस्कर, भरत कोळी या नगरसेवकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.

शिवसेनेच्या बैठकीत महानगरातील ज्येष्ठ व निष्ठावंत समजले जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी न लावल्याने नाराजीचा सूर सेनेत उमटू लागला आहे. माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राहुल नेतलेकर, सुनील ठाकूर, जितेंद्र गवळी, सोहम विसपुते यांच्यासह राष्ट्रवादीतून सेनेत आलेले निलेश पाटील हे देखील या बैठकीत गैरहजर राहिले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here