[ad_1]
हायलाइट्स:
- नाना पटोलेंच्या तक्रारीनंतर आमदारांना ‘फोन टॅपिंग’ची धास्ती
- राष्ट्रवादी काँग्रेसनं केली चौकशीची मागणी
- गृहमंत्र्यांनी ईडी व अन्य यंत्रणांकडे चौकशी करावी – जयंत पाटील
‘२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता व माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. अमजद खान असा माझ्या नावाचा कोड ठेवण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती पटोले यांनी आज सभागृहात दिली. जयंत पाटील यांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
वाचा: भाजपच्या ‘त्या’ आमदारांवरही कारवाई करा; राष्ट्रवादी आक्रमक
‘अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याच्या मागे ईडी लावतो, त्याच्या मागे सीबीआय लावतो’ अशी वेगवेगळी विधानं ऐकायला मिळतात. त्यामुळं मंत्री म्हणून नव्हे तर सभागृहाचा सदस्य म्हणून मी एक बाब निदर्शनास आणू इच्छितो. सभागृहातील सदस्यांचे फोन महाराष्ट्राबाहेरची एखादी तपास यंत्रणा टॅप करत असेल तर त्यांचं संरक्षण करणं ही अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे. सीबीआय, एनआयए किंवा ईडीकडून राज्याच्या सभागृहातील किती सदस्यांचे फोन टॅप केले जात आहेत, त्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी माहिती घ्यावी किंवा चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
वाचा:माझा फोन टॅप करून अमजद खान नावाचा कोड ठेवला; पटोलेंचा आरोप
[ad_2]
Source link