Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अरेरे! दुचाकीवर झाड पडून आजी व नातवाचा मृत्यू

अरेरे! दुचाकीवर झाड पडून आजी व नातवाचा मृत्यू

0
अरेरे! दुचाकीवर झाड पडून आजी व नातवाचा मृत्यू

कोल्हापूर: आजीला दुचाकीवरून गावी सोडायला जात असताना रस्त्यावरील झाड अचानक पडल्याने आजी व नातू दोघेही ठार झाले. गडहिंग्लज शहरात सकाळी झालेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Tree Falls on bike in Gadhinglaj)

याबाबत अधिक माहिती अशी, सतीश जोतिबा शिंदे हे गडहिंग्लज शहरात काम करतात. ते आपली आजी शांताबाई पांडुरंग जाधव यांना आत्याळ या गावी सोडून कामावर जाणार होते. आत्याळ गावी जाताना गडहिंग्लज येथील हॉटेल सूर्या समोर अचानक त्यांच्या गाडीवर रस्त्यावरील मोठे झाड पडले.

झाड अंगावर पडल्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. आजी आणि नातू यांचा या पद्धतीने अचानक मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली. गेले दोन दिवस गडहिंग्लज परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हे झाड पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here