सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 9.06 टक्के आहे तर ऑक्सिजन बेड्सची टक्केवारी 55.20 टक्के इतकी असून महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट झाला आहे. जिल्ह्याकरिता 21 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत नवीन आदेश लागू केले आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज जाहीर केले.
काय सुरू काय बंद?
अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह – बंद राहतील.
रेस्टॉरंट्स – सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 % आसन क्षमतेुनसार डायनिंग सुरू राहिल. सायंकाळी 04.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील.
सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग – दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत.
खाजगी आस्थापना / कार्यालये – सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
धार्मिक, सामाजिक, राजकिय आणि सांस्कृतिक / करमणूकीचे कार्यक्रम / मेळावे – सोमवार ते शक्रवार सभागृह / हॉल आसन क्षमतेच्या 50 % उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
लग्नसमारंभ – जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत.
अंत्ययात्रा / अंतविधी – जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत
बैठका / निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – सभागृह / हॉल आसन क्षमतेच्या 50% लोकांच्या उपस्थितीत.
बांधकाम – फक्त बांधकाम साईटवर निवासी / वास्तव्यास मुभा बाहेरून मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
ई कॉमर्स वस्तू व सेवा- नियमित पूर्ण वेळ
व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स – दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50% पूर्व परवानगीसह
दरम्यान, नव्या नियमावलीनुसार खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर बॅंकीग वित्त संस्था कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरू राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.