पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
निवडणूक आयोगाने नुकतेच धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला व नागपुर येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहिर केल्या आहेत.महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळे ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.
या ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या विरोधी महाभकास आघाडीच्या विरोधात व निषेधार्थ हे धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात करण्यात आले.
सदर जाहिर झालेल्या निवडणुका तात्काळ पुढे ढकलाव्यात म्हणुन सदर आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जोपर्यंत इंपिरिकल डाटा सरकार सादर करित नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. परंतु महाभकास सरकार याबाबत टाळाटाळ करित असुन ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणलेले आहे.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम हे राज्य सरकारचेच काम असून तो केंद्र सरकारने द्यावा असा चुकीचा हट्ट धरून महाविकास आघाडी सरकार त्यांची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलत आहे.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आलेलं आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर,म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व नाकर्तेपणा मुळेच ओबीसींना आरक्षण मिळत नाही . सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले तेव्हा राज्य सरकारने परत अपिल करायला पाहिजे होते. पण या महाविकास आघाडी मधल्या निष्क्रिय मंत्र्यांमुळे आपल्या ओबीसी समाजावर आज ही वेळ आलेली आहे. या सरकारला ओबीसी समाजाबद्दल काहीही देणेघेणे नाही. ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण लवकरात लवकर देण्याची सुबुद्धी ह्या निष्क्रिय सरकारला व्हावी म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत.
भा ज पा ओबीसी प्रदेशाध्यक्ष श्री योगेश टिळेकर म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी व मराठी समाजाचे आरक्षण रखडवले आहे. एम्पिरिकल डेटा हा राज्य सरकार ने मान्य करून ओबीसी ना आरक्षण दिले पाहिजे.पण राज्य सरकार हे आरक्षण देत नाही. आगामी निवडणुकीच्या आधी ओबीसी ना राजकीय आरक्षण सरकार ने दिले पाहिजे. पण ते देण्याची राजकीय इच्छाशक्ती ह्या ठाकरे सरकारची दिसत नाही. म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत
सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी चे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष श्री योगेश पिंगळे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर चे प्रभारी गणेश कळमकर,भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद सायकर, धनंजय जाधव, वंदनाताई कोद्रे, निखील पंचभाई, विनीत बाजपेयी, जीवन जाधव, सागर भुमकर, दिनेश नायकु, बंडुभाऊ कचरे, नंदकुमार गोसावी,शंतनु नारके, यशोधन आखाडे,रोहन कोद्रे, अमोल पांडे, विशाल केदारी,विक्रम फुंदे, मनोज साळी, सुप्रिया ताई भूमकर, दिप्तीताई पाटोळे, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष श्री
अतुल चाकणकर,किरण बारटक्के,सिद्धांत भाट, विकी ढोले,भीमराव देवकाते, दिनेश रासकर, सुरेश धनगर, प्रमोद परदेशी, ऊज्वलाताई हाके, भाग्यश्री गायकवाड, मीना ढोले, स्मिताताई गायकवाड, स्वाती धनगर व पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.