Home महाराष्ट्र कोकण ठोस निर्णय घ्या…. कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा

ठोस निर्णय घ्या…. कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा

0

मुंबई: अतिवृष्टी, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी २४ जुलै रोजी महाडमधील तळिये येथील दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली.’तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळं तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावकऱ्यांना दिले. मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका,असा टोला भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान कोकणवासीयांवर गेल्या २ यावर्षात ३ नसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला. गेल्यावर्षी आलेलं निसर्ग चक्रीवादळ, यंदाच्या वर्षी आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि आता महापुराची संकट आले आहे. मागील दोन्ही वेळेस केवळ घोषणा आणि आश्वासने सरकारने दिली. कोणतीही आर्थिक मदत कोकणवासियांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. त्यामुळेच उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here