Home महाराष्ट्र Dhangar Reservation : धनगर नेत्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

Dhangar Reservation : धनगर नेत्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

0
Dhangar Reservation : धनगर नेत्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

मुंबई | शासननामा न्यूज ऑनलाईन

चौंडी येथे गेल्या 16 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी बुधवारपासून पाणी प्राशन करणं बंद केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही बैठक झाली नाही.

याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पाणी देखील सोडलंय. धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी आज धनगर नेत्यांसोबत सरकार बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आरक्षणाचा तिढा सुटणार की आणखी तीव्र होणार हे पहाणं महत्वाचं असणार आहे,

अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.या बैठकीसाठी यशवंत सेनेचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे.

चौंडीतील शिष्टमंडळातील सदस्यांची नावे

बाळासाहेब दोडतले, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सेना
माणिकराव दांगडे, प्रदेशाध्यक्ष यशवंत सेना
गोविंद नरवटे, राष्ट्रीय संघटक यशवंत सेना
समाधान पाटील, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत सेना
नितीन धायगुडे, सरचिटणीस यशवंत सेना

अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर अशी उपोषणाला बसणाऱ्यांची नावं आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालवल्यनेृ 19 तारखेला पुण्याला ससून रुग्णालयात हलवले, आधी त्यांना 15 तारखेला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आहे. सुरेश बंडगर यांनी 20 तारखेपासून पाणी देखील सोडले आहे.

सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली

चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचं यावेळी माजी आमदार रामहरी रूपावर यांनी सांगितले . यावेळी बोलतांना रुपावर यांनी म्हटलं की, ‘राज्य सरकार ना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शिफारस करतयं, ना बंद पडलेलं एनटी आरक्षण सुरु करत आहे. त्यामुळे हा धनगर समाजावर मोठा अन्याय होतोय. आता न्याय मिळण्यासाठी धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात आले. तर सध्या धनगर समाजाकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला राज्य सरकार किती गांभीर्याने घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर धनगर समाजाकडून कोणती पावलं उचलली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here