[ad_1]
हायलाइट्स:
- मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणी मोठी कारवाई.
- चारकोप येथील शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द.
- पालिकेच्या पथकाने रुग्णालयाला ठोकले सील.
वाचा: तिवरे धरणग्रस्तांना हक्काचा निवारा मिळाला, पण…; मुख्यमंत्री झाले भावुक
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज संकुल येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली. तर बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत लसींचा पुरवठा कांदिवली, चारकोप येथील शिवम रुग्णालय येथून केला जात होता असे समोर आले आहे. लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचेही उजेडात आले आहे. त्यामुळे लसींच्या नावाखाली नेमके काय दिले, याबाबत अधिक तपास सुरू आहे. शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने आज केली. त्यानुसार हे रुग्णालय सील करण्यात आले, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
वाचा: शिवसेनेत काय चाललंय?; मंत्री गुलाबराव पाटलांवर आमदाराचा गंभीर आरोप
पुन्हा लस देण्याचा विचार
बोगस लसीकरण प्रकरणात लाभार्थ्यांना देण्यात आलेली लस नेमकी काय होती, याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर संबंधितांची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच त्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र केंद्राकडून रद्द करण्याची कार्यवाही पालिकेला करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना तपासून त्यांना पुन्हा लस देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
वाचा:राज्यात आज ८ हजार ७५३ नवे करोना रुग्ण; या ६ जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक
[ad_2]
Source link